वृत्त – अनलज्वाला
*आदर*
*करू कुणाचा आदर आता मनात माझ्या*
*जो तो करतो दिवसा चोरी घरात माझ्या*
*वेड्या मनास समजावू मी कसे कळेना*
*प्रेयसीचीच दारी आली वरात माझ्या*
*गांगरले मन साधे भोळे दुभंग झाला*
*जो-तो पाही प्रेमभंग हा जनात माझ्या*
*विसरूच कशा अमुच्या भेटी दोन मनांच्या*
*वाहत होत्या त्या आठवणी नसात माझ्या*
*जो तो फसवी तसे फसविले तिनेच मजला*
*नाही उरले आता काही करात माझ्या*
*- कवयित्री सुसिमा थोरात*
12/05/2021
@All rights reserved.