* बहावा *

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
* ●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○ बहावा○*

मंद ,धुंद ,गार वारा, पहाटे जसा वहावा,
फुलतो सखे तसा ग, ग्रीष्मातुनी बहावा.

झळाळी सोन्याची लेऊन, शालू पिवळा नेसे,
नव्या ऋतूची, नवी नवलाई, रूपात त्याच्या दिसे.

फुलला जणू बेभान होऊन, रंग सोनेरी त्याला,
असेल का येत आठवण, त्याच्या सखीची त्याला?

श्रीमंतीची तुलना त्याच्या, होतं नसे कोणाशी,
देई शांतता पाहणाऱ्या अन, हसेल तो स्वतःशी.

रूप देखणे बहाव्याचे, क्षणोक्षणी बहरावे,
रंगा गंधातुनी पिवळ्या, अलगदपणे लहरावे.

वर्षा ऋतुची देई चाहूल, उन्हाळ्याला विसावा,
हात पसरुनी कवेत घेण्या, उभा दिसे बहावा….

– कवयित्री सुसिमा थोरात

13/05/2021

@All rights reserved.

@ Image source – Google.

https://susima.home.blog/2021/05/13/बहावा/
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

Leave a comment