संपली पानगळ शिशीरातली,
जाणार संपून रुक्षपणा आता,
करुनि कोकिळा कूजन, गायन
उभी स्वागतास वसंत येता.
कोवळी पालवी वृक्षा फुटे,
आंबा मोहोर घेऊनि फुले,
गुलमोहरही बहरून गेला,
शालू हिरवा धरित्री नेसे.
प्रवास दिशेने वसंत ऋतूच्या,
चैतन्यपूर्ण वरदान असे,
संपून जाता उदासपणा,
सृष्टी प्रफुल्लित होत असे.
साद घालतो सखा सखीला,
हंगाम विणीचा सुरु होत असे,
पक्षी सुरेल गायन करुनि,
हाक सख्या ते देत असे.
असेल कितीही ऊन चैत्राचे,
थंड गारवा लाभत असे,
वातावरणही फुलून गेले,
किमया हि विधात्याची असे.
– सुसिमा .


